Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (12:21 IST)
ठाकरेंसंदर्भात सरकार कायदेशीर सल्ला घेणार
उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावरून मुंबईत उसळलेल्या तणावासंदर्भात मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बुधवारी कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.
बिहारी व उत्तर भारतातील खासदारांविरोधात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत कॉंग्रेस कायदेशीर सल्ला घेणार आहे. याच संदर्भात विलासरावांची सोनियांशी चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, यासंदर्भात आम्ही कायदेशीर सल्ला घेण्याच्या विचारात असल्याचे विलासरावांनी सांगितले. एखादा अग्रलेख लोकांच्या भावना दुखवत असल्यास तो कायदा आणि सुव्यवस्था भंग करण्यासही कारणीभूत ठरू शकतो, असे ते म्हणाले.