शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 5 ऑक्टोबर 2016 (12:28 IST)

पीएम मोदींनी CCS सोबत केली मीटिंग, सर्जिकल स्ट्राइकचे व्हिडिओ सार्वजनिक करण्याबद्दल झाली गोष्ट

सर्जिकल स्ट्राइकच्या गोपनीयतेवर प्रश्न उठल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्योरिटी (CCS)सोबत बैठक करत आहे. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, सेनाचे पाक अधिकृत काश्मिरात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे काही व्हिडिओ रक्षा मंत्रालयाला सोपवण्यात आले आहे आणि बुधवारच्या मीटिंगमध्ये यावर चर्चा झाली.  
 
सेनेने रक्षा मंत्रालयाला सोपवले व्हिडिओ   
सर्जिकल स्ट्राइकचे व्हिडिओ प्रसिद्ध करायचे आहे की नाही, यावर देखील सीसीएस मीटिंगमध्ये निर्णय होऊ शकतो. सेनेने सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे आणि व्हिडिओ रक्षा मंत्रालयाला सोपावाले आहे आणि यावर अंतिम निर्णय आता पंतप्रधान मोदी आणि कॅबिनेटला घ्यायचे आहे की सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे सार्वजनिक केले पाहिजे की नाही.  
 
पुरावे मागण्यार्‍यांचा चांगला समाचार घेतला नायडूंनी   
केंद्रीय मंत्री वेंकैया नायडू यांनी सर्जिकल स्ट्राइकचे पुराव्यांना घेऊन राजकारण करणार्‍यांवर हल्ला केला आहे. त्यांनी म्हटले, 'पाकिस्तान सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागत आहे आणि हे नेते देखील पुरावे दाखवण्याची मागणी करत आहे. पण असल्या प्रकारचे बेजबाबदार विधानांचे उत्तर देण्याची गरज नाही आहे.'