शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 22 नोव्हेंबर 2014 (10:39 IST)

'आप'चे आमदार एम.एस.धीर यांचा भाजपमध्ये प्रवेश

दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वीच माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला धक्का बसला आहे. आपचे आमदार एम.एस.धीर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 
 
मोदींचे विकासाचे मॉडेल पाहता आपच्या इतर आमदारांनीही भाजपमध्ये यावे, असे वक्तव्य यावेळी एम.एस.धीर यांनी केले आहे. दुसरीकडे आपचे आणखी एक आमदार हरिश खन्ना हे देखील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे.
 
दरम्यान, धीर यांच्या भाजप प्रवेशाने पक्षाला कुठलाही धक्का बसलेला नाही, असे आपचे प्रवक्ते आशुतोष यांनी म्हटले आहे. आपकडून तिकीट मिळत नसल्यानंच त्यांनी भाजपची वाट धरल्याचेही आशुतोष यांनी म्हटले आहे.