सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 11 फेब्रुवारी 2015 (13:00 IST)

पराजयाचा परिणाम, अमित शाह यांच्या मुलाच्या लग्नात नाही वाजले बेंडं बाजे

10 फेब्रुवारी रोजी जेथे एकीकडे दिल्लीत निवडणुकीच्या परिणामामुळे दिल्ली समेत संपूर्ण देश डुबलेले होते तेथेच दुसरीकडे भाजप अध्यक्ष  अमित शहा यांच्या पुत्राच्या लग्नाची तयारी जोरात सुरू होती. 
 
अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांचे लग्न मंगळवारी त्यांच्या कॉलेजची मैत्रीण रिशितासोबत झाले. वृत्तानुसार दिल्ली निवडणुकी परिणामाचा सरळ परिणाम या लग्नावर पडला. आधीपासून निश्चित झालेल्या वराचे घोडीवर स्वार होण्याची विधी कँसल करण्यात आली.  
 
बेंडं बाजे वाल्यांना परत पाठवण्यात आले. पराभवाचे वृत्त बाहेर आल्याबरोबरच अमित शहा आणि भाजपचे बरेच राष्ट्रीय नेत्यांनी लग्नाचा    वेन्यू (अहमदाबादच्या वायएमसीए क्लब)मध्ये मीटिंग केली.  
 
दिल्लीत प्रेस कॉन्फ्रेंस करावे की नाही, अमित शहा यांनी फोनवर केजरीवाल यांचे अभिनंदन करावे की नाही या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मंडपाजवळच व्हीआयपी कक्षेत करण्यात आलेल्या या मीटिंगमध्ये राजनाथ सिंह, आनंदीबेन पटेल, पीयुष गोयल आणि राजीव प्रताप रूडी समेत बरेच  नेते होते. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, बैठकीत हे निश्चित करण्यात आले की या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत घेणे गरजेचे आहे.