Widgets Magazine

मुस्लिम महिलेने केला हिंदूचा अंत्यसंस्कार

muslim women
वारंगल- धार्मिक भेदभाववर वाद निर्माण करण्यार्‍यासाठी तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील एका घटनेनं मानवतेचे दर्शन घडवले आहे. येथील एका वृद्धाश्रमात राहणार्‍या हिंदू नागरिकाचे नुकतेच निधन झाल्यानंतर त्यांच्या धर्मांतरण केलेल्या ख्रिश्चन मुलाने आपले वडील हिंदू असल्याचे कारण सांगत त्यांचा अंत्यविधी करण्यास नकार दिला. मात्र, कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यानंतर वृद्धाश्रम चालविणार्‍या मुस्लिम महिलेने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
याकूब बी नावाची ही महिला आणि तिचा पती येथे वृद्धाश्रम चालवितात. घरातून काढून दिल्यामुळे टेलरिंगचे काम करणारे 70 वर्षाचे के. श्रीनिवास या वृद्धाश्रमात राहत असताना त्यांचे निधन झाले. त्यानंतर मुलाशी संपर्क साधल्यावर त्यांच्या मुलाने वृद्धाश्रमात येऊनही आपल्या वडिलांचा अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला, कारण त्याने धर्मांतरण करून ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यामुळे अखेर याकूब बी यांनी सर्व धार्मिक विधी पूर्ण करीत श्रीनिवासन यांचा अंत्यसंस्कार केला.
के. श्रीनिवास माझ्या वडिलांसारखे होते. त्यांच्या अंतिम संस्कार करण्याचे मला भाग्य मिळाले, असेही याकूब बी यांनी म्हटले.


यावर अधिक वाचा :