व्हिडिओ काढण्यासाठी गंगेत उडी मारली अन् बुडाला

देहरादून- मित्रांनी मोबाईलवर व्हिडिओ शूट करण्यासाठी गंगेत उडी मारायला सांगितल्यानंतर उडी मारलेला तरुण बेपत्ता झाला आहे. हरिद्वारजवळ ही घटना घडली आहे. आशिष गंगेत बुडतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
मोबाईलवर नाटकी व्हिडिओ शूट करण्यासाठी मित्रांनी 27 वर्षीय आशिष चौहानला गंगेत उडी मारण्यासाठी सांगितलं. दारु प्यायलेला आशिष सुरुवातीला उडी मारण्यासाठी तयार नव्हता. पण नंतर मित्रांनी जास्त जबरदस्ती केल्यावर आशिषने उडी मारली. मात्र वाहत्या पाण्यात त्याचा टिकाव लागला नाही आणि काही वेळातच तो बुडाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या मित्रांनी हे सर्व मोबाईल शूट केलं असून हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
आशिष त्याचे मित्र आश्विनी चौहान आणि बलराज कुमार यांच्यासोबत दारु प्यायला बसला होता. त्यानंतर त्यांनी पोहायला जायचं , आणि हे सगळं मोबाईलमध्ये शूटही करायचं ठरवलं. आशिष चौहानने उडी मारल्यानंतर खुप वेळ झाला तरी तो दिसत नसल्याचं पाहून मित्रांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र खूप वेळ झाल्यानंतरही आशिष न दिसल्याने मित्रांनी पोलीस स्टेशन गाठलं.

आशिष चौहानच्या कुटुंबाने कोणत्याही प्रकारची तक्रार पोलिसांत केलेली नाही. आशिषच्या मृत्यूला आम्ही कोणालाही जबाबदार मानत नाही असं त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना पत्रातून सांगितलं आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

.खासदार प्रज्ञासिंह ठाकूर कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

.खासदार प्रज्ञासिंह ठाकूर कोकिलाबेन रुग्णालयात दाखल
भोपाळच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांना श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने मुंबई येथे ...

बापरे ! ओडिशाच्या सोनपुरात लग्नाचा आनंद शोकात बदलला

बापरे ! ओडिशाच्या सोनपुरात लग्नाचा आनंद शोकात बदलला
ओडिशाच्या सोनपुरात एक अतिशय वेदनादायक अपघात झाला. लग्नाची संधी होती

मनसुख हिरेन यांचा मृत्यू बुडूनच झाला, पोलिसांचा प्राथमिक ...

मनसुख हिरेन यांचा मृत्यू बुडूनच झाला, पोलिसांचा प्राथमिक अहवाल
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या ...

PM मोदी यांना आणखी एक मोठा सन्मान मिळाला, यांना जागतिक ...

PM मोदी यांना आणखी एक मोठा सन्मान मिळाला, यांना जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी केंब्रिज एनर्जी रिसर्च असोसिएट्स वीक ((Cambridge ...

मुलाच्या कमाईवर आई वडिलांचाही समान अधिकार

मुलाच्या कमाईवर आई वडिलांचाही समान अधिकार
नवी दिल्ली- पोटगीप्रकरणी न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय देत म्हटले की की कोणत्याही ...