मंगळवार, 9 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: भोपाळ , सोमवार, 22 ऑगस्ट 2016 (10:54 IST)

शिवराजसिंह चौहान यांना पोलिसांनी उचलून नेलं!

shivraj singh chouhan
पूरग्रस्त गावांचा दौरा करणा-या मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना पुरातून जाणे अशक्य झाल्यानं पोलिसांनी त्यांना पाण्यातून चक्क उचलून नेलं. शिवराजसिंह यांना उचलून घेतलेला फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.

मध्यप्रदेशमधील अनेक जिल्ह्यांना पुराचा जोरदार फटका बसला आहे. पूरग्रस्त गावांचा दौरा करण्यासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांना दुथडी भरुन वाहणारी नदी पार करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली. पोलिसांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी उचलून नदी ओलांडण्यास मदत केली. पन्ना जिल्ह्यात पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहोचलेले मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना पुरातून जाणे अशक्य झाल्यानं पोलिसांनी त्यांना पाण्यातून उचलून नेलं. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये आलेल्या पुराची व्याप्ती लक्षात येत आहे.