10 कोटी नोकऱ्या धोक्यात, संसदीय समितीच्या रिपोर्टमध्ये माहिती

it company
Last Modified गुरूवार, 30 जुलै 2020 (09:19 IST)
कोरोनामुळे विकसनशील असलेल्या भारतामध्ये मोठे संकट उभे केलं आहे. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या लॉकडाऊन काळात सर्व उद्योगधंदे बंद पडले होते. त्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक मदत म्हणून काही घोषणा देखील केल्या होत्या. मात्र, तरी सुद्धा या क्षेत्रावर आलेले ग्रहण दूर होतांना दिसत नाहीये. MSME क्षेत्राला तीन लाख कोटी रुपयांचे स्वतंत्र पॅकेज देऊन सुद्धा, या क्षेत्रातील सुमारे १० कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता एमएसएमई मंत्रालयाने वर्तवली आहे. प्रवास आणि पर्यटन क्षेत्रावर झाले वाईट परिणाम दिसून येतोय.
एमएसएमई मंत्रालयाने सांगितल्यानुसार, कोरोना संसर्गामुळे टुरिझम आणि ट्रॅव्हल क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे कोट्यवधी लोकांचा रोजगार गेला आहे. त्यासाठी रद्द झालेल्या दौऱ्याचा जीएसटी परत करणे, भरणा जमा करण्यात सूट देणे आणि एक वर्षासाठी विमा प्रीमियम घेणे अशी पावले उचलावी लागतील.

MSME क्षेत्रात सुधारणा नाही
तसेच एमएसएमई मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे की, कोरोना संसर्गाचा सर्वाधिक परिणाम औद्योगिक क्षेत्रावर झाला आहे. ज्या ठिकाणी ७२ टक्के औद्योगिक उत्पादन होते तेथे कोरोना संसर्गाची ५० टक्के प्रकरणे आहेत. अमेरिका, युरोप आणि चीनमधील परकीय गुंतवणुकीवर भारताची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. दरम्यान, आरबीआयने केलेल्या सर्वेक्षणात असे सांगितले आहे की, कोरोना संसर्गाच्या संकट काळात एमएसएमई क्षेत्र आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी धडपडत आहे. यातील बहुतांश क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात आणि त्वरित मिळणाऱ्या उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. पुढील सहा महिन्यात एमएसएमई क्षेत्र उभारी घेईल याची शक्यता धूसर असल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

देशातील हे पहिले वेब रेडिओ केंद्र: सौ. विमलबाई गरवारे ...

देशातील हे पहिले वेब रेडिओ केंद्र: सौ. विमलबाई गरवारे प्रशालेतर्फे ‘मएसो सुबोधवाणी’
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलबाई गरवारे प्रशालेतर्फे ‘मएसो सुबोधवाणी’ हे वेब ...

गायीची जशी पूजा केली जाते, तशी शेतकऱ्याची पूजा करायला हवी : ...

गायीची जशी पूजा केली जाते, तशी शेतकऱ्याची पूजा करायला हवी : अबू आझमी
नव्या कृषी कायद्यांविरोधात मुंबईतील आझाद मैदानात संयुक्त शेतकरी किसान मोर्चा धडकला आहे. ...

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नागपूरच्या श्रीनाथ ...

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नागपूरच्या श्रीनाथ अग्रवालची निवड
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नागपूरच्या श्रीनाथ अग्रवाल यांची इनोव्हेशन ...

नागपुरचे ‘निकरवाले’ तामिळनाडूचं भविष्य ठरवू शकत नाही – ...

नागपुरचे ‘निकरवाले’ तामिळनाडूचं भविष्य ठरवू शकत नाही – राहुल गांधी
नागपुरचे निकरवाले तमिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाही, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल ...

शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा : ३०८ पाकिस्तानी ट्विटर हॅण्डल्स ...

शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा : ३०८ पाकिस्तानी ट्विटर हॅण्डल्स सापडले
प्रजासत्ताक दिनी काढण्यात येणारा ट्रॅक्टर मोर्चा हायजॅक करण्यासाठी पाकिस्तानमधील ३०० ...