मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

गुजरातमध्ये 154 नरेंद्र मोदी करणार मतदान

अहमदाबाद- गुजरात विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी या नावाचे एक दोन नव्हे तर तब्बल 154 मतदार मतदान करणार आहेत. ऐकून आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. 
 
गुजरात विधानसभा निवडणुकीतही याच नावाचा चमत्कार पाहायला मिळणार आहे. नरेंद्र मोदी नावाचे 154 मतदार असल्याची नोंद निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही नाव आहे. हे सर्व जण विधानसभा निवडणुकीत मतदान करणार आहेत. पंतप्रधान मोदींचे नाव अहमदाबाद जिल्ह्यातील मतदार यादीत आहे. याच जिल्ह्यात नरेंद्र मोदी नावाचे सर्वाधिक मतदार आहेत.