सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 26 सप्टेंबर 2021 (11:17 IST)

16 वर्ष नंतर लष्कराच्या जवानाचा मृतदेह बर्फात दफन केलेला आढळला,मृतदेह पूर्णपणे सुरक्षित

गाझियाबाद. मुरादनगर भागात राहणाऱ्या सैन्यात तैनात अमरीश त्यागी यांचा मृतदेह 16 वर्षांनंतर उत्तराखंडमध्ये सापडला आहे. त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात शांतता पसरली आणि कुटुंबाच्या आठवणी ताज्या झाल्या.असे सांगितले जात आहे की बर्फ कापून रास्ता बनवताना अमरीशचे मृतदेह सापडले आहेत,जे 16 वर्षांनंतरही पूर्णपणे सुरक्षित आहे.प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मृतदेह ताब्यात आल्यावर त्यांच्यावर पूर्ण आदराने अंत्यसंस्कार केले जातील.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मुरादनगरच्या हंसाली गावात राहणाऱ्या राजकुमाराचा धाकटा मुलगा अमरीश त्यागी सैन्यात सेवा देत होता. सुमारे 16 वर्षांपूर्वी उत्तराखंडच्या जोशीमठ येथे कर्तव्यावर असताना 4 जवान संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता झाले होते. यापैकी 3 जवानांचे मृतदेह सापडले, परंतु अमरीश त्यागी यांचा शोध लागला नाही. सर्व प्रयत्नांनंतरही जेव्हा कोणतीही माहिती मिळाली नाही, तेव्हा लष्कराच्या मुख्यालयातून त्याचे सर्व सामान त्याच्या कुटुंबातील सदस्यांना देण्यात आले. तो बेपत्ता झाला त्यावेळी त्याच्या लग्नाला फक्त एक वर्ष झाले होते आणि त्याची पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांनाही त्याला रेकॉर्डवर मृत दाखवून भरपाई देण्यात आली होती.अमरीश बेपत्ता झाले त्यावेळी त्यांची पत्नी गर्भवती होती.नंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिले.परंतु पत्नीचा पुनर्विवाह करण्यात आला.
 
अमरीशचे आई -वडील नेहमी मुलाच्या जाण्याच्या दुःखात राहत होते.त्यांना असे वाटत होते की तो अजून ही जिवंत आहे.या दुःखा मुळे वडील राजकुमार यांचे 10 वर्षांपूर्वी, तर आई विद्यावतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले.आता अमरीशचा मोठा भाऊ रामकिशोर आणि पूतणा दीपक हे दोघे गावात राहतात. दीपक आयुध निर्माण फॅक्टरीत काम करतो.अचानक, 16 वर्षांनंतर, शुक्रवारी संध्याकाळी, दीपकला फोन आला की आपल्या काकाचे अमरीशचे मृतदेह उत्तराखंडच्या हर्सीलजवळ बर्फात पुरलेले आढळले आहे. दीपकने लगेच कुटुंबीयांना याची माहिती दिली आणि ही बातमी संपूर्ण परिसरात आगीसारखी पसरली.
 
16 वर्षांनंतरही शरीर पूर्णपणे सुरक्षित आहे
दीपक ने सांगितल्याप्रमाणे, लष्कराच्या जवानांनी त्याला सांगितले की पर्वतांवर बर्फ कापून रस्ता बनवला जात आहे. दरम्यान, अमरीशचा मृतदेह सापडला आहे. त्याला त्याच्या नावाच्या प्लेट बेल्टने ओळखले गेले आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शरीर पूर्णपणे सुरक्षित आहे.अपेक्षित आहे की मंगळवार किंवा बुधवारपर्यंत अमरीशचे पार्थिव त्याच्या मूळ गावी सन्मानाने येण्याची शक्यता आहे. या माहितीनंतर,त्याचे नातेवाईक आणि कुटुंबासह ​​संपूर्ण परिसरातील लोकांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. एसडीएम यांनी सांगितले की आतापर्यंत त्यांच्याकडे अशी कोणतीही माहिती नाही. जर तसे असेल आणि जेव्हा अमरीशचे पार्थिव गावात येईल तेव्हा त्यांच्या वर पूर्ण आदराने अंत्यसंस्कार केले जातील.