testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात अबू सालेम, मुस्तफा डोसा दोषी

मुंबई| Last Modified शुक्रवार, 16 जून 2017 (14:00 IST)
1993 च्या मुंबंई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात अबू सालेम याला न्यायालयाने दोषी ठरवले असून मुस्तफा डोसा याच्यासह चार जणांवरील आरोप सिद्ध झाले आहेत. दरम्यान, या सर्वांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. विशेष टाडा न्यायालयाने आज केलेल्या सुनावणीत हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील शेवटच्या खटल्यातील आरोपींना आज विशेष न्यायालयाने निर्णय देत अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान आणि करिमुल्ला शेख या सर्वांना टाडा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या सर्वांना कट रचणे, हत्या प्रकरण आणि टाडा कलमा अंतर्गत न्यायालयाने दोषी ठरवले आहे.


यावर अधिक वाचा :