सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 19 जून 2019 (09:45 IST)

ओम बिर्ला यांचे लोकसभा अध्यक्ष पदासाठी नाव पुढे

राजस्थानच्या कोटा येथून खासदार असलेले ओम बिर्ला यांचं नाव लोकसभा अध्यक्षासाठी पुढे करण्यात आलं आहे. ओम बिर्ला यांची पत्नी अमिता बिर्ला यांनी म्हटलं की, ही आमच्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आम्ही कॅबिनेटचे आभारी आहोत.
 
लोकसभा अध्यक्ष पदासाठी अनेक वरिष्ठ खासदारांच्या नावाची चर्चा होती. यामध्ये मेनका गांधी, राधामोहन सिंह, रमापती राम त्रिपाठी, एसएस अहलुवालिया आणि डॉ. वीरेंद्र कुमार हे दिग्गज होते.
 
राजस्थानच्या कोटा येथून भाजप खासदार असलेले ओम बिर्ला हे आता लोकसभेचे नवे अध्यक्ष असणार आहेत. ओम बिर्ला हे आज आपला अर्ज दाखल करतील. बुधवारी ससंदेत लोकसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी मतदान होईल.