शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 एप्रिल 2024 (09:29 IST)

लग्नात फटाक्यांमुळे घराला आग,एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

fire
बिहारमधील दरभंगा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे लग्नाच्या मिरवणुकीत फटाक्यांमुळे एका घराला आग लागली. त्यामुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळी पोहोचले . 
 
मिळालेल्या माहितीनुसार, दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर ब्लॉकमधील अंतोर गावात ही घटना घडली. गावात लग्नसमारंभ चालू होता. यावेळी लोक लग्नात फटाके फोडत होते. दरम्यान, फटाक्यांच्या ठिणगीमुळे घराला आग लागली. काही वेळातच आग इतकी पसरली की ती विझवणे कठीण झाले.
 
आग घरात ठेवलेल्या गॅस सिलिंडरपर्यंत पोहोचली आणि काही वेळाने सिलिंडरचा स्फोट झाला. यानंतर दारात ठेवलेल्या डिझेलच्या ड्रमलाही आग लागली, त्यामुळे प्रकरण अधिकच भयावह बनले. काही वेळातच संपूर्ण घरामध्ये आगीच्या ज्वाळांचा भडका उडू लागला.
 
सर्वत्र आरडाओरडा झाला. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागले. संपूर्ण घरातील साहित्य जळून खाक झाले. यावेळी आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली. ज्वाळा दूरवर दिसत होत्या. लोकांनी तत्काळ पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. या घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 

Edited By- Priya Dixit