गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 सप्टेंबर 2024 (11:00 IST)

5 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून हत्या

child death
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गुरुवारी एका इमारतीतील घरात मृतावस्थेत सापडलेल्या पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकारींनी ही माहिती दिली आहे. या प्रकरणी एक आरोपी, त्याची आई आणि बहिणीला अटक करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार भोपाळचे पोलीस अधिकारी एचसी मिश्रा यांनी सांगितले की, पोस्टमार्टमच्या  अहवालानुसार तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. मिश्रा म्हणाले की, मुलीचे शेजारी, तिची आई आणि बहिणीला अटक करण्यात आली आहे. तसेच पोस्टमोर्टमचा संपूर्ण अहवाल शुक्रवारी मिळेल, मंगळवारी, मृत चिमुरडी ती राहत असलेल्या इमारतीतून बेपत्ता झाली होती, त्यानंतर तिच्या शोधासाठी ड्रोन आणि डायव्हर्स सोबत किमान 100 पोलीस तैनात करण्यात आले होते.
 
"ती त्याच इमारतीत एका फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली," असे अधिकारी म्हणाले. तिचा मृतदेह बाथरूममध्ये उंच शेल्फवर प्लास्टिकच्या डब्यात होता. यापूर्वी घराची झडती घेतली असता ते दिसून आले नाही. आरोपींना मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती आणि चार वेळा प्रयत्न केला पण इमारत व परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त असल्याने ते होऊ शकले नाही.
 
मृतदेह सापडल्यानंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पुढील चौकशी सुरु असल्याचे पोलीस अधिकारींनी सांगितले आहे.

Edited By- Dhanashri Naik