सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 7 सप्टेंबर 2024 (09:56 IST)

मध्यप्रदेशात रेल्वे अपघात, इंदूर-जबलपूर एक्सप्रेस रुळावरून घसरली

मध्य प्रदेशातील जबलपूर रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना टळली. येथे इंदूर-जबलपूर एक्स्प्रेस गाडी पलटी होण्यापासून वाचली. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे 5.50 वाजता ट्रेन जबलपूर स्थानकावर पोहोचली. त्यानंतर रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले. पण, गाडीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना घडली नाही. ट्रेनमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचे काम सुरू आहे. रेल्वे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले.
 
इंदूर-जबलपूर ओवरनाइट एक्स्प्रेसचे दोन डबे फलाटावर येण्यापूर्वीच रुळावरून घसरले. याबाबत माहिती देताना पश्चिम मध्य रेल्वेचे सीपीआरओ हर्षित श्रीवास्तव म्हणाले की, "इंदूर-जबलपूर ओव्हरनाइट एक्स्प्रेस जी इंदूरहून येत होती आणि जबलपूरला जात होती, तेव्हा ती डेड स्टॉप स्पीडवर असताना तिचे दोन डबे रुळावरून घसरले. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.