मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 15 मार्च 2022 (23:05 IST)

नदीत बोट उलटल्याने 20 जणांचा बुडून मृत्यू, 6 महिला आणि मुले अद्याप बेपत्ता

युपीच्या बाराबंकी येथे मंगळवारी सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. येथे गोमती नदीत एक बोट उलटली. बोटीवर 20 लोक होते. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. एका वृद्धाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तर 11 ग्रामस्थांनी पोहत नदीतून बाहेर आले. गोताखोरांनी दोन मुलांना बाहेर काढले. सध्या महिला आणि लहान मुलांसह 6 जण बेपत्ता आहेत. पोलीस आणि शोध पथक त्यांचा शोध घेत आहेत.
 
पोलीस आणि प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारीही घटनास्थळी हजर आहेत. गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस बचावकार्यात लागले आहेत. ही संपूर्ण घटना सुबेहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिगनिहा गावाजवळील गोमती नदी घाटातील आहे. बोटीवरील लोक समारंभासाठी  नदीपलीकडे जात होते.
 
 मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोमती नदीत झालेल्या बोट दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने घटनास्थळी पोहोचून बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
अपघातानंतर नदीत पोहून बाहेर आलेल्या रामचंद्रने सांगितले . 'आम्ही सगळे एकाच बोटीने जात होतो. आमची बोट नदीच्या मध्यभागी पोहोचताच अचानक पाण्याचा प्रवाह तीव्र झाला. आधी बोट पाण्याने भरली, त्यानंतर ती थेट पाण्यात गेली. बोट बुडताच लोकांनी उड्या मारायला सुरुवात केली. माझा पाय कुठल्यातरी मुळात अडकला होता, त्यामुळे मी जास्त खाली गेलो नाही आणि काही वेळाने पोहत बाहेर आलो.
 
बिग्निहा गावातील वीस लोक नदी ओलांडून बोटीने दुसऱ्या गावात समारंभासाठी जात होते. बोटीवर 4-5 सायकलही ठेवण्यात आल्या होत्या. गोमती नदी ओलांडत असताना जोरदार प्रवाहामुळे बोटीचा तोल गेला. बोट असंतुलित होऊन नदीत उलटली.
 
पोलिसांनी सूरज बक्षचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तर भवानी भिख, रामचंद्र, मायाराम, सुशील तिवारी, सुमिरन, श्यामू यादव हे नदीतून बाहेर आले आहेत. महिला आणि लहान मुले नदीत बुडाल्याचे या लोकांनी सांगितले. सुमारे 6 जणांचा शोध सुरू आहे.