बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 13 जानेवारी 2020 (17:10 IST)

#राजसाहेब_मी_तुमचा_तान्हाजी असा नवा ‘हॅशटॅग’ सुरु

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी #राजसाहेब_मी_तुमचा_तान्हाजी असा नवा ‘हॅशटॅग’ सुरू केला आहे. त्यामुळ मनसेच्या या नव्या हॅशटॅगची जोरदार चर्चा सुरू आहे. २३ जानेवारीला मनसेचे महाअधिवेशन मुंबईमध्ये पार पडणार आहे.
 
यापुढील निवडणुका जिंकण्याचा निर्धार मनसेचे कार्यकर्ते करताना दिसत आहे. जसे औरंगजेबाच्या ताब्यातील कोंढाणा पुन्हा जिंकण्यासाठी स्वराज्याचे-शिवरायांचे शिलेदार तान्हाजींनी स्वत;च्या जीवाची बाजी लावली तसे आपण आपला पक्ष वाढवू असे आवाहन सोशल मिडीयाच्या माध्यमातून मनसेचे कार्यकर्ते करताना पहायला मिळत आहे. तसेच भविष्यात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये मनसेचा प्रत्येक मनसैनिक तान्हाजी प्रमाणे लढून मनसेचा गड अबाधित ठेवेल असा निर्धार सर्व मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.