बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

निर्भया बलात्कार प्रकरण : फाशीचे लाईव्ह प्रसारण करा

दिल्लीत २०१२ साली घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना २२ जानेवारी रोजी फाशी दिली जाणार आहे. या फाशीचे लाईव्ह प्रसारण करण्यात यावे, अशी मागणी एका एनजीओने केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे या मागणीचे पत्र देण्यात आले आहे. दिल्लीतील परी या संस्थेच्या संस्थापिका योगिता भयाना यांनी ही मागणी केली असून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना तसे पत्र दिले आहे.
 
आपल्या पत्रात भयाना यांनी लिहिले आहे की, बलात्काऱ्यांना होत असलेली फाशी महिला सुरक्षेच्या विषयावर चिंता दूर करण्याची संधी भारताला आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांना याचे थेट प्रसारण करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.