शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 14 सप्टेंबर 2024 (19:42 IST)

तीन मजली घर कोसळले, आठ हून अधिक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती,बचावकार्य सुरू

मेरठ मधील लोहिया नगर पोलीस स्टेशन हद्दीतील झाकीर कॉलनी गल्ली क्रमांक सातमध्ये एक 50 वर्ष महिलेचे तीन मजली घर पावसामुळे कोसळले आहे. घर कोसळल्यामुळे संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे.
घरात आठहून अधिक लोक गाडल्याचे वृत्त स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे घर एका 50 वर्षीय महिलेचे आहे. ती तिच्या दोन मुला आणि सुनांसह या घरात राहते. हे कुटुंब दुग्ध व्यवसाय करतात. या घराच्या तळमजल्यावर म्हशी बांधलेल्या होत्या. घर कोसळल्यावर मशी देखील गाडल्या गेल्या 

माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. शहरातील जुना परिसर व दाट लोकवस्तीचा परिसर असल्याने जेसीबीने आत जाता येत नाही. त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे. 

मेरठ विभागाच्या आयुक्त सेल्वा कुमारी यांनी सांगितले की, 8-10 लोक अडकले आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत. मेरठ विभागाच्या आयुक्त सेल्वा कुमारी यांनी सांगितले की, लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफला माहिती देण्यात आली आहे.
Edited by - Priya Dixit