शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 8 मार्च 2017 (09:48 IST)

आधार कार्ड नाही, मग इतर कागदपत्र ग्राह्य धरली जाणार

आधार कार्ड नाही, त्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आधार कार्ड नसेल, तर कुणालाही सरकारी सुविधेपासून वंचित ठेवू नये, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. आधार कार्ड नसेल तर त्याऐवजी ओळखपत्र म्हणून इतर कागदपत्र ग्राह्य धरली जातील. मात्र संबंधित व्यक्ती जोपर्यंत आधार कार्ड काढत नाही, तोपर्यंतच त्याची इतर कागदपत्र ग्राह्य धरली जातील, असंही सरकारने नमूद केलं आहे.
 
केंद्र सरकारने नुकतंच 30 पेक्षा अधिक सरकारी सुविधांसाठी आधार अनिवार्य केलं आहे. जवळपास 84 प्रकारच्या सरकारी सुविधांसाठी सध्या आधार अनिवार्य आहे. मात्र आधार नसलेल्यांची चिंता वाढली होती. त्यामुळे जोपर्यंत आधार काढलं जात नाही, तोपर्यंत सरकारने इतर कागदपत्र वापरण्याची सवलत दिली आहे. अंगणवाडीसारख्या बालविकास योजनांसाठी आधार अनिवार्य करण्यात आलं आहे. मात्र शाळा आणि अंगणवाडींनाही केंद्र सरकारने ज्या मुलांकडे आधार नसेल, त्यांची आधारसाठी नोंदणी करुन घेण्याचे आदेश दिले आहेत.