Widgets Magazine
Widgets Magazine

मृत्यू प्रमाणपत्रासाठी आधारकार्ड बंधनकारक

शनिवार, 5 ऑगस्ट 2017 (11:13 IST)

आता केंद्र सरकारने मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठीही आधार कार्ड बंधनकारक केले आहे. १ ऑक्टोबर २०१७ पासून हा निर्णय लागू होणार असून मृत्यू झालेल्या व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांकही मृत्यूचा दाखला काढताना द्यावा लागणार आहे. शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रजिस्ट्रार जनरल इंडियाने पत्रक काढून मृत्यूच्या दाखल्यासाठीच्या नवीन नियमाची माहिती दिली. मृत्यूचा दाखला काढताना मयत व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक द्यावा लागणार आहे. यामुळे मयत व्यक्तीच्या आधार कार्डचा गैरवापर होणार नाही, तसेच त्या व्यक्तीविषयीची माहितीही सरकारकडे उपलब्ध असेल असे सूत्रांनी सांगितले. तसेच मयत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी विविध कागदपत्रे सादर करण्याची गरज राहणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मेघालय, आसाम आणि जम्मू काश्मीर वगळता देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी हा निर्णय लागू असेल.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

बोकड दूध देतो....!

गाई-म्हशी शेळी दूध देतात, हे तुम्हा- आम्हाला माहीत आहे. मात्र, बोकड दूध देतो, असे म्हटले ...

news

अमित शहांच्या दौर्‍यासाठी शाळा बंद

भाजप अध्यक्ष अमित शहा सध्या हरियाणाच्या दौर्‍यावर आहेत. या निमित्ताने भाजपकडून एका रॅलीचे ...

news

प्राप्तिकर विभागाकडून तब्बल 15 कोटींची रोकड, दागिने जप्त

कर्नाटकचे ऊर्जामंत्री आणि कॉंग्रेस नेते डी.के.शिवकुमार यांना लक्ष्य करून प्राप्तिकर ...

news

अमेरिकेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची आणि पंकजा मुंडे यांची भेट

‘लेजिस्लेटीव्ह फेलोज प्रोग्राम’ अंतर्गत अमेरिकेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र ...

Widgets Magazine