testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आरुषी-हेमराज खुन प्रकरण, आज निकाल

नोएडामधील आरुषी-हेमराज खुनाप्रकरणी गुरुवार अलाहबाद हायकोर्ट आपला निर्णय

सुनावणार आहे. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास याप्रकरणी निकाल येण्याची शक्यता आहे. सीबीआय कोर्टानं सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला तलवार दाम्पत्यानं हायकोर्टात आव्हान दिलं होतं. ज्यावर निकाल दिला जाणार आहे.

सीबीआय कोर्टानं राजेश आणि नुपूर तलवार यांना दुहेरी हत्याकांडात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याच शिक्षेविरुद्ध त्यांनी अलाहाबाद हायकोर्टात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती बीके नारायण आणि न्यायमूर्ती एके मिश्रा यांच्या खंडपीठानं तलवार दाम्पत्याच्या या अर्जावर सुनावणी करत सात सप्टेंबरला आपला निर्णय राखून ठेवला होता.यावर अधिक वाचा :