गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अभिनंदनच्या मिशांना राष्ट्रीय मिशीचा दर्जा द्या

विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या मिशांना राष्ट्रीय मिशीचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली. ते  लोकसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात यावा. तसेच त्यांच्या मिशांना राष्ट्रीय मिशीचा दर्जा द्यावा, असे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले. 
 
यावेळी चौधरी यांनी भाजप सरकारलाही लक्ष्य केले. तुम्ही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना तुरुंगात टाकले का? या सगळ्यांना चोर म्हणत तुम्ही सत्तेवर आलात. मात्र, यानंतर तुम्ही कोणतीही कारवाई केली नाहीत. मग तुम्हाला संसदेत बसण्याचा हक्क आहे का, असा सवाल चौधरी यांनी विचारला.