शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जुलै 2017 (17:37 IST)

अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा द्यावी : सीबीआय

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सीबीआयने न्यायालयात केली आहे. सालेमनं केलेलं कृत्य हे फाशीच्या शिक्षेच्या योग्यतेचं आहे, मात्र प्रत्यार्पण कायद्यानुसार फाशी देऊ शकत नाही असं सांगत सीबीआयने जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली. विशेष टाडा न्यायालयात आरोपींना काय शिक्षा द्यायची, यावरून युक्तिवाद सुरू आहे. सीबीआयने ताहीर मर्चंट आणि करीमुल्ला खानला फाशीचीच शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी विशेष टाडा न्यायालयाला केली आहे. पोर्तुगालमधून भारतात प्रत्यार्पण करून आणलेला अबू सालेमही फाशीच्या शिक्षेस पात्र आहे, मात्र त्यात कायदेशीर अडचणी आहेत, असे सीबीआयने विशेष न्यायालयाला याआधीही सांगितले होते.