शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जून 2023 (19:12 IST)

Accident : अपघातानंतर दारूसाठी लोकांची धावपळ

drink
दारूसाठी लोक काहीही करायला तत्पर असतात. दारूच्या बाटल्या वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचा अपघात झाला त्यात दारूच्या बाटल्यांचा कर्टन्स खाली पडला.अपघातानंतर दारूच्या बाटल्या लुटण्यासाठी लोकांची गर्दी झाली. सदर घटना आंध्रप्रदेशातील अनकापल्ले ते बयावरम दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर घडली. दारूची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचा अपघात झाला.स्थानिक लोकांनी ट्रक चालक आणि वाचकाची मदत करण्याऐवजी दारूच्या बाटल्या लोकांनी चोरून नेल्या. या पूर्वी देखील अशा घटना झाल्या आहे.  

बिअरच्या बाटल्यांच्या 200 कार्टन्सचा संपूर्ण भार जमिनीवर पडल्याने परिसरातील स्थानिक लोकांनी ट्रकचालक आणि क्लिनरला मदत करण्याऐवजी त्या चोरण्यासाठी धाव घेतली.ही घटना सोमवारी सायंकाळी अनकापल्ले ते बयावरम दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर घडली. या घटनेचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले





Edited by - Priya Dixit