शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (16:11 IST)

अक्षता नाईक सांगतात की, मी पोलिसांचे आभार मानते

'२०१८ हे वर्ष आम्ही कधीच विसरू शकत नाही. आज महाराष्ट्र पोलिआंनी जो दिवस आणलाय त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. सुसाईड नोट मध्ये नाव असून कारवाई त्यावेळी करण्यात आली नाही. पण आज ती केली आहे म्हणून पोलिसांचे आभार मानते', या शब्दात अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी आभार मानले आहेत. 
 
अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणात रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे. २०१८ साली अन्वय नाईक यांनी रिपल्बिक चॅनलचे इंटिरिअरचे काम केले होते. त्यावेळी कामाचे पैसे न दिल्यामुळे नाईक यांनी आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी अर्णब गोस्वामीच्या नावाचा उल्लेख केला होता. या संदर्भात अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. 
 
सुसाईड नोटमध्ये फिरोज शेख, अर्णव गोस्वामी यांचं नाव होतं. तरीही त्यावेळी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अर्णव गोस्वामी यांनी मुद्दाम रक्कम परत दिली नाही, असा आरोप अक्षता नाईक यांनी केला आहे.  कोव्हिड व्हायरस नाही तर अर्णव गोस्वामी नावाचा हा व्हायरस आहे, असं देखील त्या यावेळी म्हणाल्या.