testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

काँग्रेसचे अहमद पटेल अवघ्या अर्ध्या मताने विजय

ahemed patel
Last Modified बुधवार, 9 ऑगस्ट 2017 (13:03 IST)

गुजरात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार अहमद पटेल यांचा अवघ्या अर्ध्या मतानं विजय झाला.

अनेक घडामोडीनंतर मध्यरात्री 2.00 वाजता हा निकाल जाहीर झाला. अहमद पटेल यांना 43.50 मतं मिळाली आहेत.

संध्याकाळी 4 वाजता मतदान पार पडल्यानंतर 5 वाजता मतमोजणी सुरु झाली. मात्र, दोन काँग्रेस आमदारांनी क्रॉस वोटिंग करत आपली मतपत्रिका तिथं उपस्थित असलेल्या अमित शाह यांना दाखवली. त्यानंतर काँग्रेसनं यावर आक्षेप घेत मतमोजणी थांबवली आणि याबाबत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. दोन्ही बाजू ऐकून आणि तेथील सीसीटीव्ही फूटेज पाहून निवडणूक आयोगानं दोन आमदारांची मत तब्बल पाच तासानंतर रद्द ठरवली. त्यानंतर 12.15 वाजता मतमोजणी सुरु झाली. पण त्यानंतर भाजप पुन्हा एकदा मतमोजणी थांबवली. अखेर रात्री 1.40 वा. पुन्हा मतमोजणी सुरु झाली.

त्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटात निकाल समोर आला. ज्यामध्ये अहमद पटेल हे अवघ्या अर्ध्या मतानं विजयी झाल्याचं समोर आलं.
दरम्यान, या निवडणुकीत अमित शाह आणि स्मृती इराणी यांना 46-46 मतं मिळाली असून तेही विजयी झाले.यावर अधिक वाचा :