1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (21:13 IST)

आश्चर्यकारक ; फुफ्फुसात अडकलेली शिट्टी काढून डॉक्टरांनी वाचवला 12 वर्षांच्या चिमुरड्याचा जीव

Amazing; Doctors rescued 12-year-old boy by removing the whistle stuck in his lungsआश्चर्यकारक ; फुफ्फुसात अडकलेली शिट्टी काढून डॉक्टरांनी वाचवला 12 वर्षांच्या चिमुरड्याचा जीव Marathi National News  In Webdunia Marathi
पश्चिम बंगालमधील एसएसकेएम रुग्णालयात 12 वर्षीय रेहानच्या फुफ्फुसात अडकलेली सीटी काढून डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवले आहेत. जेव्हा जेव्हा तो  तोंड उघडत असे तेव्हा त्याच्या तोंडातून शिट्टीचा कर्कश आवाज यायचा.
पश्चिम बंगालच्या बारूईपूर परिसरातील सरकारी रुग्णालयातील (एसएसकेएम) डॉक्टरांनी 12 वर्षीय रेहानच्या फुफ्फुसात अडकलेली शिट्टी काढून त्याचे प्राण वाचवले. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, जानेवारीमध्ये रेहान लष्करने बटाट्याच्या चिप्स खाताना चुकून ही शिट्टी गिळली होती आणि त्याला 11 महिने कोणताही त्रास आढळला नाही.
जेव्हा जेव्हा तो तोंड उघडायचा तेव्हा त्याच्या तोंडातून शिट्टीचा कर्कश आवाज यायचा. सुरुवातीला त्याच्या या त्रासाची माहिती पालकांना मिळाली नाही. पण एके दिवशी जवळच्या तलावात पोहायला गेल्यावर त्याला पूर्वीसारखे पाण्यात डुंबता आले नाही. त्यानंतर रेहान ने छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली.
यामुळे कुटुंबीयांनी रेहानला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टर त्याच्यावर उपचार करू शकले नाहीत. यानंतर, दुसर्‍या डॉक्टरांनी मुलाच्या फुफ्फुसात संसर्ग पाहून त्याला एसएसकेएम रुग्णालयात पाठवले, जिथे त्याला ओटो राइनोलॅरिगोलॉजी विभागात ठेवण्यात आले. त्यानंतर गुरुवारी प्रोफेसर अरुणाभा सेनगुप्ता यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने रेहानवर शस्त्रक्रिया करून प्लॅस्टिकची शिट्टी काढण्यात आली. डॉक्टरांच्या अथक परिश्रमाने रेहानचे प्राण वाचविण्यात त्यांना यश मिळाले.