शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

राम मंदिर प्रश्नी अध्यादेश काढता येणार नाही अमित शहा यांचा खुलासा वाचा कारण

देशातील राजकारण सध्या राममंदिराभोवतीच पुन्हा पुन्हा फिरताना किंवा फिरवला जातो आहे. लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्यानं राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा काही पक्ष त्यातही शिवसेना चर्चेत आणला आहे.  शिवसेनेनं तर भाजपची कोंडी करण्यासाठी आता थेट अयोध्या पाऊल ठेवले असून, . त्यामुळे भाजपमध्ये देखील कुठेतरी अस्वस्थता समोर आली आहे.  राम मंदिरासाठी अध्यादेश काढा अशी मागणीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं यापूर्वी केली असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही मागणी भाजपनं फेटाळून लावली आहे असे तरी चित्र आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर बांधणं ही आमची प्राथमिकता आहे. पण, त्यासाठी अध्यादेश काढला जाणार नाही असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. 
 
राम मंदिर प्रकरण संवेदनशील असून ते  न्यायप्रविष्ठ आहे त्यामुळे अध्यादेश काढणे शक्य नाही असे अमित शहा यांनी  म्हटलं आहे. त्यांनी हिंदी वृत्तवाहिनी झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीतमध्ये असे सांगितले आहे.  राम मंदिर मुद्दा सध्या न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे त्याबाबत आता अद्यादेश आणला जाणार नाही असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.त्यामुळे सध्यातरी राम मंदिर होणे नाही असे स्पष्ट होते आहे.