Widgets Magazine
Widgets Magazine

राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार चाचपणी सुरु

सोमवार, 12 जून 2017 (23:07 IST)

राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपने सहमतीचा उमेदवार देण्याबाबत चाचपणी करायला सुरुवात केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमली आहे. केंद्रातल्या तीन वरिष्ठ मंत्र्यांचा यात समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांचा या समितीत समावेश आहे. राष्ट्रपतीपदाबाबत सहमतीचा उमेदवार निवडण्यासाठी विविध राजकीय पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी या तिघांवर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे केवळ एनडीएच नव्हे, तर इतर विरोधी पक्षांशीही चर्चा ही समिती करणार आहे. दिल्लीत राष्ट्रपतीपदावरुन हालचाली सुरु झाल्या. अमित शहांनी आपला नियोजित अरुणाचल दौरा रद्द करुन, आधी या समितीच्या स्थापनेसाठी बैठक घेतली.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

प्रतिक्षा संपली, 13 जूनला दहावीचा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी / मार्च ...

news

वन नाईट स्टॅड म्हणजे लग्न नव्हे!

वन नाईट स्टँड किंवा स्त्री-पुरुषामधील शरीरसंबंध म्हणजे हिंदू कायद्यानुसार लग्न ठरत नाही ...

news

भारत सदिच्छा हेतूने 11 पाकिस्तानी कैद्यांची सुटका करणार

भारत सरकार सदिच्छा हेतूने 11 पाकिस्तानी कैद्यांची सुटका करणार आहे. कझाकस्तान येथे शांघाय ...

news

शरद पवारांकडून फडणवीस सरकारचे कौतुक

शेतकऱ्यांची एकजूट ही समाधानकारक बाब आहे. सुकाणू समिती सगळे मतभेद दूर करून एकत्र आली आणि ...

Widgets Magazine