testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

राणे - अमित शहा भेट राजकीय हालचालींना वेग

amita shah and rane
Last Modified गुरूवार, 13 एप्रिल 2017 (12:44 IST)
सध्या कॉंग्रेस मध्ये नाराज असलेले कोकणाचे
नेते माजी मंत्री
नारायण राणे यांनी अहमदाबाद येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली आहे.
तर या भेटीचे विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांची भेट झाली आहे.
तर दुसरीकडे नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी नारायण राणे हे कोणताही निर्णय घेऊ शकतात असे वक्तव्य केले आहे त्यामुळे मोठा निर्णय होतो का असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर काही दिवसा पूर्वी नितीन गडकरी शिवसेनेतून काँग्रेस मध्ये गेले ही चूक होती असे वक्तव्य केले होते.
नारायण राणे हे कॉंग्रेस पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या तर राणे आयांनी अनेकदा टीका केली आहे. नारायण राणे यांनी अहमदाबाद येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अमित शाह यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. राणे भाजपमध्ये प्रवेश करणार का ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


यावर अधिक वाचा :