गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

रामलीलावर अण्णा यांचे आदोलन संपले

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस दिल्ली येथे रामलीला मैदानावर पोहोचले. येथे अण्णा हजारे यांचे आदोलन संपले. अण्णा यांनी मागणी मान्य झाल्याची घोषणा केली. या आगोदर त्यांनी रामलीला मैदानावर जाण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात चर्चा, पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी श्रीकर परदेशीही उपस्थित होते. 

यामध्ये विशेष असे की  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण सातव्या दिवशीही सुरुच होते. मात्र अण्णांच्या प्रकृतीबाबत आंदोलकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले होते.

आंदोलनातून काय हाती लागलं असा प्रश्न पुढे येतो सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार लवकरच सरकार कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता देण्याबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन करणार आहे. तर सोबतच कृषी अवजारांचा जीएसटी 12 वरून 5 टक्क्यांवर आणणारआहे,लोकपालबाबत कालमर्यादा देण्याची मागणी मान्,-निवडणूक सुधारणांबाबत सरकार सकारात्मक पाऊल उचलणार, सूत्रांची माहिती दिली आहे.