शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

झाकीर नाईकविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईकविरोधात एनआयए कोर्टाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. दहशतवादी कृत्याला चिथावणी देऊन समाजांत द्वेष पसरवण्याचा आरोप नाईकवर ठेवण्यात आला आहे. याआधी आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी झाकीर नाईकविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे.
 
झाकीर नाईकविरोधातील तपासात ईडीकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याने एनआयएने न्यायालयात धाव घेऊन अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्याची विनंती केली होती. नागरिकांना उपदेशाच्या नावाखाली हिंसक कारवाया करण्यासाठी चिथावणी देणे, नागरिकांच्या धार्मिक भावना भडकावणे असे गंभीर आरोप ठेवत झाकीर नाईकविरोधात 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.