Widgets Magazine

हा तर स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा - केजरीवाल

Last Modified गुरूवार, 17 नोव्हेंबर 2016 (15:03 IST)
चलनातून ५०० आणि १००० रुपयाच्या नोटा
रद्द करणे हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा आहे असा आरोप आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. दिल्लीच्या आजादपूरमध्ये केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांनी संयुक्त सभा घेतली. ५०० आणि १ हजारच्या नोटेची जागा २ हजारची नोट घेणार त्यामुळे भ्रष्टाचार कसा कमी होणार ?
२००० रुपयाची नोट काळा पैसा कसा संपवणार ? मी आयकर आयुक्त होते मलाही थोडेफार कळते असे केजरीवाल यांनी सांगितले. सरकारने कोणालाही थांगपत्ता लागू न देता विजय मल्ल्याला देशाबाहेर पळून जायला मदत केली असा आरोप
केजरीवालांनी केला.


यावर अधिक वाचा :