Widgets Magazine

दोन मुलांची हत्या करून शवाजवळ बसून राहिला बाप

Last Modified गुरूवार, 17 नोव्हेंबर 2016 (15:01 IST)
दिल्लीच्या महेंद्र पार्क भागात एका व्यक्तीने रात्री झोपत असलेल्या आपल्या दोन मुलांची हत्या करून स्वत: देखील आत्महत्या करण्याच्या हेतूने मुलांच्या शवाजवळ बर्‍याच तासांपर्यंत बसून राहिला.

बुधवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास त्याने स्वत:च पीसीआरला कॉल करून डबल मर्डरची माहिती दिली. पोलिस जेव्हा तेथे पोहोचली तेथे दोन्ही मुलांचे शव पलंगावर पडलेले होते.

पोलिसांनी आरोपीला अटक करून दोन्ही मुलांचे शव ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे. पोलिसांना सुरुवातीच्या तपासणीत हे माहीत पडले आहे की एक वर्ष आधी बायकोचा मृत्यू आणि शेजार्‍यांच्या एक्सटॉर्शनमुळे त्रासलेल्या आरोपीने एवढे मोठे पाऊल उचलले आहे. पोलिस सर्व प्रकारे तपासणी करत आहे.


यावर अधिक वाचा :