1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 6 जून 2018 (08:47 IST)

विमानाप्रमाणे आता रेल्वेत मोजूनच सामान, अति वजन रेल्वे आकारणार शुल्क

रेल्वे सुधारत आहे. तर रेल्वे प्रवाशांसाठी फार  महत्त्वाची बातमी आहे. जसे  विमान प्रवासाप्रमाणेच ट्रेनमधूनही मर्यादेपेक्षा अतिरिक्त लगेज/सामान  नेताना सतर्क राहणे गरजेचे होणार आहे. यामध्ये रेल्वेने ठरवून दिलेल्या मर्यादेनुसार अतिरिक्त शुल्क न देता स्लीपर क्लासमधून 40 किलो आणि सेकंड क्लासमध्ये 35 किलोपर्यंत लगेज नेता येणार आहे. मात्र  पार्सल ऑफिसमध्ये पेमेंट करुन अनुक्रमे 80 किलो आणि 70 किलो सामान नेता येणार. अतिरिक्त सामान हे माल डब्यात ठेवण्यात येणार आहे. तर अनकेदा ररेल्वेचा गैरफायदा घेत , प्रमाणावर सामान नेले  जात होते. त्यानुसार रेल्वेने आपल्या 30 वर्षांपूर्वीच्या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचं ठरवलं आहे. यानुसार अतिरिक्त सामान नेल्यास ठरलेल्या मर्यादेपेक्षा सहा पट दंड आकारण्यात येईल, अशी माहिती रेल्वेतील एका अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे रेल्वेला उत्पन्नाचे मार्ग निघणार असून, फुकटात कितीही समान नेत असलेल्या व्यापारी नागरीका यांना चाप बसणार आहे.