शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 29 ऑक्टोबर 2018 (16:13 IST)

ओवैसीनी राम मंदिराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा टिपण्णी

asaduddin owaisi
अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी मोदी सरकार अध्यादेश का काढत नाही, प्रत्येक वेळी ते अध्यादेश काढण्याची धमकी देत असतात, टॉम, डिक अँड हॅरी असलेल्या भाजपा, आरएसएस, विहिंप अशा धमक्या देत असतात. तुमच्याकडे सत्ता आहे. मी तुम्हाला आव्हान करतो की, अध्यादेश काढून दाखवा, असंही एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी  म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीही एमआयएमचे असदुद्दीनं ओवैसी यांनी राम मंदिराच्या वादावर टिपण्णी केली होती. राम मंदिर बांधण्यापासून कोण अडवतंय. त्यांनी अयोध्येत राम मंदिर बांधून दाखवावं. भाजपाला देशात धार्मिक विविधता नको, त्यांना उदारमतवाद नको. भाजपाला देशात एकाधिकारशाही राबवयाची आहे. त्या पक्षाचा विविधता आणि कायद्यावर विश्वास नाही, असंही ओवैसी म्हणाले होते.