testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

Last Modified बुधवार, 12 जुलै 2017 (11:56 IST)

जम्मू काश्मीरच्या बडगावमध्ये भारतीय सैन्यानं तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. मंगळवारी रात्री झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे तीन दहशतवादी मारले गेले आहेत. या तीनही दहशतवाद्यांचे मृतदेह सैन्यानं ताब्यात घेतले आहेत.

काश्मीरच्या बडगावमध्ये खात्मा करण्यात आलेल्या जवानांकडे मोठा शस्त्रसाठाही होता. खात्म्यानंतर हा साठा जप्त करण्यात आलाय. अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्यानंतर सैनिकांनी बडगाम आणि परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. त्याच दरम्यान हे दहशतवादी आढळले आहे, ज्यानंतर झालेल्या चकमकीत त्यांचा खात्मा करण्यात आलाय.

दरम्यान बडगावसह आसपासच्या परिसरात आणखी दहशतवादी लपले आहेत का, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत.यावर अधिक वाचा :