Widgets Magazine

पाकव्याप्त काश्मीरमध्ये आझादीच्या घोषणा

हाजिरा- पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक लोकांनी पाकच्या अत्याचारविरोधात आवाज उठवायला सुरूवात केली आहे. पाकचे राजकीय पक्ष आणि लष्करी नेतृत्वाविरूद्ध एका व्यापक आंदोलनाला या भागात सुरूवात झाली आहे. शरीफ सरकार आणि पाकच्या लष्कराविरोधात येथे आझादीच्या घोषणा देण्यात आल्या आहेत.
लियाकत हयात खान यांनी पाक लष्कराविरोधात या आझादीच्या घोषणा दिल्या आहेत. ते म्हणाले की पाकव्याप्त काश्मीरमध्ये अतिरेकी पाठवणे बंद करा. पाकच्या अत्याचाराचा कहर झाला आहे आणि आता तेथील स्थानिक लोक पाकिस्तानातून येणार्‍या अतिरेक्यांना हुसकावून लावतील, असे खान यांचे म्हणणे आहे.


यावर अधिक वाचा :