Widgets Magazine
Widgets Magazine

बाबरी मशिद प्रकरण : पुढील सुनावणी पाच डिसेंबरला

शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (11:33 IST)

अयोध्येतील राम जन्मभूमी  आणि बाबरी मशिदीच्या जमिनीवरून सुरू असलेल्या वादावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आणि दस्तऐवजांचे भाषांतर येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. मूळ कागदपत्रे, दस्तऐवज संस्कृत, पारशी, उर्दू आणि अरबी भाषांमध्ये आहेत. त्यांच्या भाषांतराचे काम पूर्ण झाले नसल्याचे सुन्नी वक्फ बोर्डाने सुनावणीवेळी सांगितले. त्यानंतर  न्यायालयाने दस्तऐवजाच्या भाषांतरासाठी अवधी दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी पाच डिसेंबरला होणार आहे.

तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची तब्बल सात वर्षांनंतर सुनावणी झाली. सर्वात आधी सात भाषांमधील दस्तऐवजांचे भाषांतर करण्यात यावे, असे न्यायालयाने सांगितले. या प्रकरणावरील सुनावणीसाठी आणखी तारीख वाढवून दिली जाणार नाही, असेही  न्यायालयाने  निक्षून सांगितले. विशेष म्हणजे या प्रकरणाशी संबंधित नऊ हजार पानांचे दस्तऐवज आणि साक्षीदारांच्या साक्षी असलेली 90 हजार पाने पाली, फार्सी, संस्कृत, अरबीसह विविध भाषांमध्ये आहेत. त्यांचे  भाषांतर करण्याची मागणी सुन्नी वक्फ बोर्डाने न्यायालयाकडे केली.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

हमीद अन्सारी यांच्यावर सामनातून टीका

देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे असं वक्तव्य करत आपला उपरराष्ट्रपतीपदाचा ...

news

बाबा रामदेव यांच्यावरील पुस्तक विक्रीवर स्थगिती

योगगुरु बाबा रामदेव यांच्या आयुष्यावर आधारित 'गॉडमॅन टू टायकून : द अनटोल्ड स्टोरी ऑफ बाबा ...

news

“वॉशिंग्टन पोस्ट’ने घेतली मराठा मोर्चाची दखल

मुंबईत 9 ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाची दखल अमेरिकेतील “द वॉशिंग्टन ...

news

गोरखपुरमध्ये ऑक्सीजन पुरवठा ठप्प झाल्याने 30 मुलांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये बीआरडी मेडिकल कॉलेज रुग्णालयातील ऑक्‍सिजनचा पुरवठा बंद ...

Widgets Magazine