Widgets Magazine

बाबरी मशिद वाद : वादग्रस्त जागेवर राम मंदिराची उभारणी शक्य

Last Modified बुधवार, 9 ऑगस्ट 2017 (09:30 IST)

बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागेवर राम मंदिराची उभारणी केली जाऊ शकते, असे शिया वक्फ बोर्डाने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. याशिवाय राम मंदिरापासून एका विशिष्ट अंतरावर मुस्लिमबहुल भागात मशिदीची उभारणी केली जावी, असेदेखील या प्रतिज्ञापत्रात शिया वक्फ बोर्डाने म्हटले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा मुद्दा निकालात निघण्याची शक्यता आहे.

शिया वक्फ बोर्डाने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारले जावे, असे म्हटले आहे. या मंदिरापासून विशिष्ट अंतरावर मशीद उभारली जावी, असेदेखील बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. ‘बाबरी मशीद शिया वक्फ बोर्डाची होती. त्यामुळे या प्रकरणात इतर पक्षकारांसोबत बातचीत करण्याचा अधिकार बोर्डाकडे आहे. संवादाच्या माध्यमातून शांततापूर्ण पद्धतीने समाधानकारक तोडगा काढण्याचा अधिकार केवळ वक्फ बोर्डाकडे आहे,’ असा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.यावर अधिक वाचा :