गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 30 मे 2017 (14:58 IST)

बाबरी मशिद प्रकरण: आडवाणी, जोशी, उमा भारतींसह 12 जणांना सीबीआय कोर्टाचा दिलासा जणांना

बाबरी खटला प्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी,मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
 
20 हजार रुपयांच्या जातमुचक्यावर या 12 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सीबीआयच्या विशेष कोर्टात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह भाजपाचे अन्य वरिष्ठ नेते हजर राहिले होते.
 
कोर्टात दाखल होण्यापूर्वी आडवाणी आणि भाजपाच्या अन्य नेत्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनौमधील व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊस येथे भेट घेतली.