शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

नायलॉन मांजाचा वापर व साठवणूकीस बंदी

मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडविताना नायलॉन मांजाच्या वापरामुळे परिसरात वावरणा-या व्यक्ती, तसेच प्राण्यांना इजा होत असल्याचे आढळून आल्याने या मांजाच्या वापरास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी घालतानाच अशा मांजाची साठवणूक न करण्याचे निर्देशही राज्य शासनाने दिले आहेत.

मकरसंक्रांतीच्या सणाच्या काळात प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूंचा वापर करून बनविण्यात आलेल्या सर्वसाधारणपणे नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्यामुळे पक्षी व मानव जिवितास इजा पोहोचण्याचे प्रकार घडले आहेत.  अनेकदा या इजा प्राणघातक ठरल्याचे आढळून आले आहे. अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी राज्य शासनाने योग्य त्या उपाययोजना आणि जनजागृती विषयक कार्यक्रम हाती घेण्यासाठी पर्यावरण अधिनियम १९८६चे कलम ५ अन्वये निर्देश दिले आहेत.

प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तूपासून बनविलेल्या नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी तसेच साठवणूकदार यांनी तत्परतेने नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक थांबविण्यात येणार आहे. या नायलॉन मांजामुळे गुरांना उद्भवणारा धोका, उपकेंद्रे बंद पडणे, वीज उपकरणे बिघडणे, अपघात घडणे, इजा व जीवित हानी आदी प्रकार टाळण्यासाठी व या धाग्याचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.