1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑगस्ट 2020 (08:57 IST)

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार

banks
ऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार आहेत. त्यामुळे ऐनवेळी अडचण होऊ नये म्हणून या सुट्ट्या नेमक्या कधी असणार हे समजून घेणं तुमच्यासाठी आवश्यक आहे.
 
ऑगस्टमध्ये १६ दिवस बॅंक हॉलीडे असणार आहे. यामध्ये रविवार आणि दुसरा चौथा शनिवार देखील आहे. त्यामुळे बॅंकाशी संबंधित व्यवहार उरकून घेण्यासाठी तारीख नोंद करुन ठेवणं गरजेचं आहे. वेगवेगळी राज्य आणि त्यातील महत्वाच्या सणांसाठी या सुट्ट्या आहेत.
अशा आहेत सुट्या 
१ ऑगस्ट- बकरी ईद 
२ ऑगस्ट- रविवार 
३ ऑगस्ट - रक्षा बंधन
८ ऑगस्ट - दुसरा शनिवार 
९ ऑगस्ट - रविवार 
११ ऑगस्ट - श्रीकृष्ण जन्माष्टमी
१२ ऑगस्ट - श्रीकृष्ण जन्माष्टमी 
१३ ऑगस्ट - इम्फाल पेट्रियोट डे 
१५ ऑगस्ट - सातंत्र्य दिवस 
१६ ऑगस्ट - रविवार 
२० ऑगस्ट - श्रीमंत संकरादेव 
२१ ऑगस्ट - हरितालिका 
२२ ऑगस्ट - गणेश चतुर्थी, चौथा शनिवार 
२३ ऑगस्ट - रविवार 
२९ ऑगस्ट - कर्मा पूजा 
३१ ऑगस्ट - इंद्रयात्रा आणि तिरुओणम