शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 25 जुलै 2020 (16:33 IST)

धोनीने IPLमध्ये आपली चमक नाही दाखवली तर ‘टीम इंडिया’चे दरवाजे कायमचे बंद होतील

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Captain Cool M S Dhoni)हा जुलै २०१९ पासून क्रिकेटपासून दूर आहे. विश्वचषकातील पराभवानंतर केवळ CSKच्या IPLआधीच्या सराव सत्रात त्याने बॅट हाती घेतली होती. पण करोनामुळे IPL लांबणीवर पडले. त्यामुळे धोनीचे पुनरागमन पुन्हा लांबणीवर पडले. आता टी-२० विश्वचषक झाल्याने IPLचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात धोनी क्रिकेटच्या मैदानावर दिसेल हे नक्की. पण त्याआधी माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू डीन जोन्स याने धोनीच्या टीम इंडियातील पुनरागमनाबद्दल एक महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे.
 
“टीम इंडियाचे संघ निवडकर्ते सध्यातरी ऋषभ पंत आणि लोकेश राहुल या दोघांबद्दलच विचार करत असतील. जर धोनीची IPL 2020 मधील कामगिरी दमदार असली तरच धोनीसाठी संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. पण जर धोनी IPLमध्ये आपली चमक दाखवू शकला नाही तर मात्र धोनीला ‘टीम इंडिया’चे दरवाजे कायमचे बंद होतील. धोनीने स्वत: तो दरवाजा उघडा ठेवला आहे. त्याला मिळालेली विश्रांती त्याच्यासाठी लाभदायक ठरू शकते. पण मला विचाराल तर दीर्घ विश्रांतीनंतर संघात स्थान मिळवणं खूप कठीण असतं”, असे डीन जोन्स म्हणाला.
 
दरम्यान, IPLच्या आगामी तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल BCCI अंतिम निर्णयापर्यंत पोहचलं असून १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ८ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. IPL गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ही माहिती दिली. स्पर्धेच्या आयोजनात कोणताही बदल करण्यात आलेला नसून BCCIने सर्व संघमालकांना याबद्दल प्राथमिक कल्पना देऊन ठेवली होती असे पटेल यांनी सांगितलं.