शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

आम्हाला करायचा भ्रष्टाचार बंद आणि त्यांना देश बंद: मोदी

आम्ही भ्रष्टाचार आणि काळा पैशाचा मार्ग बंद करु पाहात आहोत. मात्र विरोधक भारत बंद करायला निघाले आहे. त्यामुळे देशवासियानो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज उत्तर प्रदेशामधील कुशीनगरमध्ये आयोजित परिवर्तन सभेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.  काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि जेडीयूवर टीकाकेली आहे.
 
गरीबांचे जीवनमान उंचावण्यासाठी नोटा बंदीचा निर्णय घेतला आहे.  पंतप्रधान म्हणाले की, ”विरोधकांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. पण वास्तवात भ्रष्टाचाराचा मार्ग बंद झाला पाहिजे की, भारत बंद झाला पाहिजे?” असा प्रश्न यावेळी उपस्थितांना विचारला. मोदींच्या या प्रश्नावर जनतेनेही हात उंचावून भ्रष्टाचार आणि काळा पैशांवर लगाम घातली पाहिजे असे सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेसचा आजचा बंद किती यशस्वी होतो हे पहावे लागणार आहे.