शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 एप्रिल 2017 (20:34 IST)

भीम अॅप रेफरल योजना जाहीर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भीम अॅप रेफरल योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत तुमच्या रेफरन्सने व्यापारी किंवा ग्राहकाने भीम अॅप डाऊनलोड केल्यास तुम्हाला दहा रुपये मिळणार आहेत. येत्या 14 ऑक्टोबर 2017 पर्यंत भीम अॅप रेफरल योजना सुरु राहणार आहे. या योजनेअंतर्गत तुमच्या रेफरन्सने व्यापारी किंवा ग्राहकाने भीम अॅप डाऊनलोड केल्यास तुम्हाला दहा रुपये मिळतील. अशाप्रकारे रोज 20 जणांना भीम अॅपचं महत्त्व समजावून डाऊनलोड करायला लावल्यास दिवसअखेर दोनशे रुपयांची प्राप्ती तुम्हाला होईल, असं मोदी म्हणाले. युवकांना डिजीटल पेमेंटकडे आकर्षित करण्यासाठी ही योजना आणल्याचं मोदी सांगतात. समर व्हेकेशनमध्ये जॉब करण्याऐवजी अशाप्रकारे महिन्याअखेर हजारो रुपये कमवण्याची संधी असल्याचंही नरेंद्र मोदींनी सांगितलं.