सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 6 जुलै 2022 (18:30 IST)

COVID-19 Precaution Dose: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता 9 नाही तर 6 महिन्यांनंतर बूस्टर डोस घेता येईल

कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने बूस्टर डोस घेण्याच्या नियमात बदल केला आहे. बूस्टर डोस आता 9 ऐवजी 6 महिन्यांनंतर लावू शकता.18 ते 59 वयोगटातील सर्व लोकांना आता 9 महिन्यांऐवजी 6 महिन्यांनी बूस्टर डोस दिला जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) सरकारची लसीकरणावरील सल्लागार संस्था, दुसऱ्या आणि बूस्टर डोसमधील अंतर कमी करण्याची शिफारस केली होती.NTAGI सूत्रांनी सांगितले की 12-17 वयोगटातील लसी कमी लागत आहेत, या वयोगटातील लोकांना 12 वर्षे वयोगटातील लोकांपेक्षा जास्त धोका असतो. बूस्टर म्हणून CORBEVAX चा वापर करण्यावर NTAGI कडून अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.
 
कोरोनापासून बचाव करण्यासाठी आतापर्यंत बूस्टर डोस घेण्यासाठी 9 महिने वाट पाहावी लागत होती. मात्र सरकारच्या या निर्णयानंतर ज्यांनी दुसरा डोस घेतला आहे, .
त्यांना डोस घेतल्यापासून सहा महिन्यांनंतर बूस्टर डोस मिळू शकेल.  
 
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि प्रशासन यांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, 18-59 वर्षे वयोगटातील  प्रत्येकजण खाजगी कोविड लसीकरण केंद्रांमध्ये (CVCs) दुसऱ्या डोसची तारीख 6 महिने किंवा 26 आठवडे पूर्ण झाल्यानंतर बूस्टर डोस घेऊ शकतो.
 
पत्रात म्हटले आहे की 60 वर्षे आणि त्यावरील लोक आणि आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंट लाइन कामगारांना दुसरा डोस 6 महिने किंवा 26 आठवडे पूर्ण झाल्यानंतर बूस्टर डोस विनामूल्य दिला जाईल.