रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑगस्ट 2023 (19:23 IST)

Bihar : मृत मुलगा 7 वर्षानंतर जिवंत परतला

social media
बिहारच्या पाटणामध्ये एक अनोखा प्रकार समोर आला आहे. येथे लाखनी बिघा पंचायतीच्या आसोपूर गावात एक वृद्ध जोडपे राहतात. सात वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या बेपत्ता मुलावर मृत समजून अंत्यसंस्कार केले होते. पण सात वर्षांनी तोच मुलगा जिवंत घरी परतल्याने या जोडप्याचा डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यांना आनंदाने अश्रू अनावर झाले.  
 
मिळालेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये आसोपूरचे रहिवासी बृजनंदन राय आणि पिरिया देवी यांचा मुलगा बिहारी राय घरातून अचानक बेपत्ता झाला. बिहारी हा मानसिक दृष्टया कमकुवत आहे. या मुळे तो घरातून कसा आणि कधी निघाला हे कळलेच नाही.  पालकांनी आपल्या मुलाचा खूप शोध घेतला. मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यानंतर वडिलांनी अंधश्रद्धेमध्ये अडकून भोंदू बाबांच्या नादी लागून आपल्या बेपत्ता मुलाचा हिंदू रितीरिवाजांनुसार त्यांचा पुतळा बनवून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले 
 
मात्र 7 वर्षांनंतर त्यांचा मुलगा जिवंत परतल्यावर त्यांना विश्वास बसेना. त्यांचा मुलगा बिहारी राय दिल्लीतील एक संस्था आणि लखनिबिघा पंचायतीचे प्रमुख शत्रुघ्न यांच्यामार्फत घरी परतला. बिहारी घरी परतताच आई-वडीलांच्या डोळ्यात मुलगा परतल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. तिला पाहताच त्याने तिला मिठी मारली.
वडील बृजनंदन राय सांगतात की, मुलगा बेपत्ता झाल्यानंतर त्यांना अनेक वेळा स्वप्नात दिसायचे. एकदा स्वप्नात मुलगा स्वतः म्हणाला की तो जिवंत आहे. त्यांनी ही गोष्ट एका भोंदू बाबाला सांगितले तर त्यांनी तुझा मुलगा आता या जगात नाही आणि त्याचा आत्मा तुला त्रास देत आहे असे सांगितले. तुला एका पुतळ्याचे मुलगा समजून त्याच्यावर अंत्यसंस्कार करावे लागणार आहे. 
 
वडिलांनी त्या बाबाच्या सांगण्यावरून एक पुतळा तयार केला आणि त्याच्यावर हिंदू रीतीने अंत्यसंस्कार केले.मात्र काही दिवसांपूर्वी गावातील प्रमुखाच्या मोबाईलवर दिल्लीतील एका संस्थेने बिहारी यांच्या हयात असल्याची माहिती दिली आणि फोटो पाठवले.बिहारीची ओळख पटल्यानंतर प्रमुखाने त्याच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. 7 वर्षानंतर बिहारी मायदेशी परतले तेव्हा त्यांच्यासोबत कुटुंबाचा आनंदही परतला 
 

Edited by - Priya Dixit