गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 10 जुलै 2023 (17:48 IST)

बिहार : पतीला सोडून शिक्षिका पत्नी मुख्याध्यापकासह फरार

love
ज्योती मौर्या यांच्यानंतर आता एक शिक्षिका पती आणि मुलांना सोडून मुख्याध्यापकासह पळून गेली आहे. हे प्रकरण बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील जंदाहा गावाशी संबंधित आहे, जिथे लग्नाला 13 वर्षे झाली तरी शिक्षिका पळून गेली. चंदन कुमार असे या पीडित पतीचे नाव आहे. एका तरुणाचा आरोप आहे की त्याने आपल्या पत्नीला मजुरीचे काम करून शिकवले. त्याची पत्नी सरकारी शाळेत शिक्षिका झाल्यावर ती आपल्या प्रियकरासह पळून गेली.
 
महिपुरा येथील रहिवासी असलेल्या चंदन कुमारचा विवाह 13 वर्षांपूर्वी समस्तीपूर जिल्ह्यातील विभूतीपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गंगोली येथील लक्ष्मी राजक यांची मुलगी सरिता कुमारीसोबत झाला होता. चंदन आणि सरिता यांना 12 वर्षांची मुलगी आणि सात वर्षांचा मुलगा आहे.
 
महिलेचा प्रेमविवाह झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. नवऱ्याचं प्रेम असं होतं की ते स्वत: मोलमजुरी करायचे, पण पत्नीला शिक्षिका बनवण्यासाठी त्यांनी अहोरात्र एक केले. मेहनतीचे फळ मिळाले आणि 2022 मध्ये ती शिक्षिका झाली. शिक्षिका झाल्यानंतर शाळेत जात असताना त्याच शाळेच्या मुख्याध्यापकाशी तिची जवळीक वाढू लागली आणि मग एकेदिवशी ती आपल्या नवऱ्याचे 13वर्षांचे प्रेम आणि दोन मुलांचे प्रेम सोडून मुख्याध्यापकाकडे पळून गेली. आता पतीने मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल केला आहे, मात्र गुन्हा दाखल होताच केस मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. 
 
Edited by - Priya Dixit